netherland-banner

भारतापासून दूर राहताना “अमृताशी देखील पैजा जिंकणाऱ्या” आपल्या मराठी भाषेविषयी, कलेविषयी, आणि संस्कृतीविषयी प्रत्येकाच्या मनात एक ओढ असते, पण ती व्यक्त करण्याकरता जी एक संधी लागते तीच संधी सगळ्या हॉलंडस्थित मराठी माणसांना मिळावी आणि सामुदायिक साहचर्यातून मराठी लोकांचे सांस्कृतिक एकत्रीकरण व्हावे या उदात्त विचारातून २०११ मध्ये “रश्मीन ” कलोपासक समूहाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. २०१५ साली महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून “रश्मीन” संस्कारित “नेदरलँडस् मराठी मंडळ” आम्ही हॉलंडस्थित मराठी माणसांसाठी घेऊन आलो.

प्रायोगिक, सृजनशील आणि कलात्मक कार्यक्रम, नृत्य, नाट्य, संगीत, कला, साहित्य आणि सामाजिक जाणिवा अशा विविध क्षेत्रात “रश्मीन” चळवळ रुजली आहे. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत इत्यादींच्या मैफिलीिंसह संगीताची ही निरंतर वाटचाल चालू आहे.

नाटक आवडत नाही असा मराठी माणूस विरळाच! आणि म्हणूनच “रश्मीन”ने हॉलंडमध्ये “नाट्यधारा” हा अनोखा कलाविष्कार यशस्वीरीत्या सुरु केला! संगीत नाटक, विनोदी नाटक, आणि विविध आशयघन कलाकृतींच्या नाट्याविष्काराने अखिल प्रेक्षक हुरळून जातो.

मराठी चित्रपटांचा प्रसार आणि त्यांची प्रसिद्धी करण्यामध्ये नेदरलँडस् मराठी मंडळाचा हातभार लागत आहे याचा“रश्मीन”ला अभिमान आहे. चित्रपटांबरोबर सुप्रसिद्ध मराठी कलाकाराना भेटण्याच्या, त्यांचाशी दिलखुलास गप्पा मारण्याच्या विविध संध्या आम्ही हॉलंडस्थित मराठी मित्र-मैत्रिणींसाठी यापूर्वीही घेऊन आलो आणि यापुढेही आणत राहू.

ज्या माय-मराठीमुळे आपले अस्तित्व आहे, त्या भाषेची सेवा केल्याशिवाय ही सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ पूर्ण होऊच शकत नाही. आणि म्हणूनच मातृभाषेचे योग्य महत्व जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी गेली चार वर्षे सातत्याने “रश्मीन”चा दिवाळी अंकाचा प्रकल्प यशस्वीरीत्या चालू असून विविध युरोपिअन देशातील मराठी बांधव ह्यात सक्रिय सहभाग घेत आहेत, याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो.

याचवर्षी एप्रिल २०१६ मध्ये नेदरलँडस् मधील अलमेलो शहरात झालेल्या ११व्या युरोपिय मराठी संमेलनाच्या नियोजनामध्ये नेदरलँडस् मराठी मंडळाने सक्रिय पुढाकार घेतल्याचा “रश्मीन”ला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणूनच ग्रँड रॅपिड्स, मिशीगन येथे २०१६ साली होणाऱ्या BMM अधिवेशनासाठी महाराष्ट्र मंडळ ऑफ डेट्रॉईट ला शुभेच्छा देताना नेदरलँडस् मराठी मंडळाला अतिशय आनंद होत आहे.

In spite of being away from India, we always have a special corner in our heart for the Marathi language, art and culture, but seldom get the means or the opportunity to express ourselves. With this simple thought, we initiated the “Rashmin” cultural movement back in 2011 for all the Marathi-Dutch society. In 2015, on occasion of Maharashtra Day, we established the ‘Rashmin’ en-cultured “Netherlands Marathi Mandal”.

The ‘Rashmin’ movement is embedded in social, economic and educational development of Maharashtra and India as well as in promoting experimental, creative and artistic programs that include dance, drama, music, art, literature as well as social perceptions of various other sectors. Music concerts of classical music and film music are constantly in the pipeline.

‘Rare is a Marathi person who does not like stage plays!’ was the thought behind starting Rashmin ‘Natyadhara’, an evening dedicated to the Marathi theater. Genres like opera, drama and comedy, the rich variety of content and enthusiastic performances caught the imagination of the audience. The huge success of Natyadhara has made it the annual flagship program of the Netherlands Marathi Mandal!

We are also proud to have contributed towards propagating Marathi cinema to an international audience. Many times, well-known Marathi artists have accompanied the movie screenings. The opportunity of casual chit-chat and conversations with them has always been appreciated by the audience.

This socio-cultural initiative cannot be complete without serving the Marathi language itself. To protect and inculcate a sense of pride for the Marathi language, we started publishing our annual magazine during the festival of Diwali. The magazine, now into its 5th year, has been appreciated by young and old alike, reaching hundreds of Maharashtrian families not only in Netherlands but also in continental Europe, Asia and US.

Being one of the participating organizers for the 11th European Marathi Sammelan held at Almelo , Netherlands in April 2016, Netherlands Marathi Mandal is very happy for the efforts taken by Marathi Mandal Detroit and wishes a huge success to BMM convention at Grand Rapids, Michigan in 2017!

netherland
netherland2