Muzeecians

‘बेला शेंडे’ म्हटलं की आपल्याला कुठली गाणी आठवतात? ‘नटरंग’ ची ‘वाजले की बारा’ आणि ‘अप्सरा आली’ ही प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली लावणीगीते आठवतात, ‘सर सुखाची श्रावणी’, ‘का कळेना कोणत्या क्षणी’ किंवा ‘ओल्या सांजवेळी’ सारखी हळुवार प्रेमगीते आठवतात. ‘जोधा अकबर’ मधलं ‘मन मोहना’ आठवतं.. पण तुम्ही बेलाचं कधी breathless गाणं ऐकलंय का? फार लोकांना माहिती नसलेलं हे एक अप्रतिम गाणं.. ‘कण्हेरीची फुलं’ album मधलं सुरेख लिहिलेलं आणि बेलाने अतिशय सुंदर गायलेलं.. हे गाणं ऐकल्यावर प्रत्येकाला आपल्या गावाची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. YouTube वर surfing करत असताना हे गाणं सापडल्यावर, समुद्रकिनारी शंख-शिंपले वेचताना अचानक मोती सापडल्यावर जसा आनंद होईल, अगदी तसा आनंद होतो!

Marathi Breathless